बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने उत्तीर्ण विध्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०५ जानेवारी २०२३ । मुंबई । बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व शास्ता दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा असा संयुक्त कार्यक्रम रविवार दि. ०८ जानेवारी २०२३ दुपारी ३ ते रात्रौ ९ या वेळेत संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस संजय तांबे करणार असून कार्याध्यक्ष दीपक मोहिते स्वागताध्यक्ष म्हणून लाभले आहेत तसेच प्रमुख विश्वस्त संजय पवार, विश्वस्त काशीराम जाधव, मुकुंद पवार व राजाभाऊ गमरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत.

तरी सदर कार्यक्रमास संघाच्या सर्व संलग्न शाखा, पदाधिकारी, सभासदांनी व पालकांनी आपल्या पाल्यांसह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती सरचिटणीस संजय तांबे यांनी बौद्धजन सहकारी संघाद्वारे काढलेल्या परिपत्रकात केली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!