दैनिक स्थैर्य | दि. ८ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) केंद्र फलटण यांच्या वतीने नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ, फलटण येथे शुक्रवार, दि. १० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ६.३० वाजता ‘दीपावली पहाट’ व धन्वंतरी पूजन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘दीपावली पहाट’ हा कार्यक्रम श्री. मंदार पंडित आणि सहकारी पुणे हे सादर करणार असून यावेळी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था केंद्र फलटण यांनी केले आहे.