जिल्हा परिषद व पंचायत समितीचे गट व गण रचना करण्याचे आदेश; या दिवशी प्रसिध्द होणार अंतिम रचना; वाचा सविस्तर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १३ जुन २०२५ । फलटण । गत काही वर्षांपासुन रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आता होणार असल्याची चिन्ह दिसु लागली आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे गण रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

यामध्ये २०२२ साली देण्यात आलेल्या आदेशानुसार गट व गण रचना होणार आहे. अर्थात फलटण तालुक्यात जिल्हापरिषदेचे ९ गट असणार आहेत तर पंचायत समितीचे १८ गण राहणार आहेत.

यामध्ये प्रारूप प्रभाग रचना ही दि. १४ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांनी प्रकाशित करायची आहेत. त्यानंतर प्रसिध्द झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर दि. २१ जुलै अखेर जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती दाखल करण्यासाठी मुभा आहे. दि. २८ जुलै अखेर जिल्हाधिकारी यांनी दाखल झालेल्या हरकती सुचनांचा सविस्तर अहवाल विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करायचा आहे. त्यानंतर प्राप्त हरकती सुचनांवर दि. ११ ऑगस्ट पर्यंत विभागीय आयुक्त यांनी सुनावणी घ्यायची आहे. दि. १८ ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्द करायची आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!