दैनिक स्थैर्य | दि. १२ जून २०२३ | फलटण |
सांगवी (ता. फलटण) गावाजवळ फलटण-बारामती रस्त्यावर काल सायंकाळी ७.०० वाजता एसटी बस व दुचाकीच्या झालेल्या अपघातात एकजण ठार झाला आहे. या अपघाताची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून नानासोा रामचंद्र घनवट (वय ५८, राहणार पवई माळ, पणदरे, तालुका बारामती, जिल्हा पुणे) असे मयताचे नाव आहे.
या अपघाताची अधिक माहिती अशी, रविवारी सायंकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास सांगवी (ता. फलटण) गावच्या हद्दीत फलटण ते बारामती रस्त्यावर हॉटेल निरा गार्डनजवळ नानासो रामचंद्र घनवट (राहणार पणदरे, तालुका बारामती, जिल्हा पुणे) हे हिरो कंपनीची मोटरसायकल (क्र. एम एच ४२ डी २१५३) वरून फलटणहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या पाठीमागून येणारी एसटी बस (क्र. एम एच १४ बी टी ३५०५) वरील चालकाने निष्काळजीपणे वेगात बस चालवून ओव्हरटेक करत असताना धक्का लागून अपघात झाला. त्यामध्ये घनवट गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी एसटी बसचालकावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोउनि दीक्षित करत आहेत.