स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि.20 (रणजित लेंभे) : वाठार स्टेशन येथील श्री स्वामी पेट्रोल पंपाजवळ कार आणि दुचाकीच्या अपघातामध्ये बिचुकले ता.कोरेगाव येथील मोटर सायकल चालक ठार.
वाठार पोलिस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार वाठार स्टेशन जवळ असणाऱ्या स्वामी पेट्रोल पंप याठिकाणी लोणंद ते सातारा रोडवर वाठार बाजूकडून जाणारी मोटर सायकल क्रमांक MH11 BR 3661 व देऊर बाजूकडून येणारी नवीन हुंडाई कंपनीची कार बिना नंबरची यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीचालक दत्तात्रय संपत पवार वय 48 रा. बिचुकले ता. कोरेगाव जि.सातारा हे मोटर सायकल चालक छातीत मार लागल्यामुळे जागेवरच मृत झाले.अपघाताची खबर मिळताच वाठार पोलिस स्टेशनचे सपोनि स्वप्नील घोंगडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला व अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. अपघातामुळे लोणंद सातारारोड वर दुतर्फा झालेली वाहनांची कोंडी सुरळीत केली तसेच अपघातातील मृतास विच्छेदन करण्यासाठी पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.पुढील तपास वाठार पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गुजर करीत आहेत.