फलटण येथे कोयत्याने वार केल्याने एक जखमी; सात जणांना पोलीस कोठडी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ५ जुलै २०२४ | फलटण |
फलटणमधील मंगळवार पेठेत रात्री झालेल्या भांडणाच्या कारणावरून चिडून जाऊन एकावर कोयत्याने वार केल्याने तो जखमी झाला आहे, यावेळी फिर्यादीस आरोपींनी शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनीही मारहाण केल्याची फिर्याद करण कानिफ घोलप (वय २०, रा. आखरी रस्ता चौक, मंगळवार पेठ, फलटण) याने फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

या प्रकरणी झाकीर कुरेशी, बंडा उर्फ सागर संजय इंगळे, आशिष अनिल इंगळे, संजय इंगळे, संदीप राजू इंगळे, संतोष अरुण इंगळे व अरुण इंगळे (सर्व रा. मंगळवार पेठ, फलटण) या सातजणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

या घटनेचा अधिक तपास सपोनि शिंदे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!