
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि.२०: विजेचा शॉक लागल्याने अतीत (ता.सातारा) येथे वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.भीमराव गोपाळ जाधव (वय.६६) असे मृताचे नाव आहे.घराच्या पाठीमागे असलेल्या आंब्याच्या झाडावरील आंबे काढण्यासाठी भीमराव जाधव झाडावर चढले होते. झाडाच्या बाजूलाच असलेल्या विजेच्या मेन वायरला वाऱ्याच्या आलेल्या झोकामुळे झाडाच्या फांदीचा या वायरला स्पर्श झाल्याने फांदीत विद्युत प्रवाह आल्याने भीमराव जाधव यांना शॉक बसला व ते खाली जमिनीवर पडले.त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची फिर्याद भाऊ अधिक गोपाळ जाधव यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.
