नवरात्रौत्सवानिमित्त ३ ते १२ ऑक्टोबरदरम्यान श्रीमंत सार्वजनिक मंडळाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटणमधील बुधवार पेठेतील श्रीमंत सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ गुरुवार, दि. ३/१०/२४ ते शनिवार दि. १२/१०/२४ पर्यंत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे. या उत्सवात दैनंदिन कार्यक्रमांमध्ये सकाळी ८:३० वाजता व रात्री ८:०० वाजता देवीची आरती होणार असून गुरुवार दि. ३/१०/२४ रोजी संध्याकाळी ७ ते १० वाजेपर्यंत देवीची मिरवणूक व मान्यवरांच्या हस्ते देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

शुक्रवार, दि. ४/१०/२४ रोजी संध्याकाळी ८ ते १० महिलांच्या हस्ते महाआरती व ओटीभरण व हळदी कुंकूवाचा कार्यक्रम होणार आहे.

शनिवार, दि. ५/१०/२४ रोजी संध्याकाळी ६ ते १० वाजेपर्यंत डान्स शो.

रविवार, दि. ६/१०/२४ रोजी संध्याकाळी होम मिनिस्टर, निवेदक विशाल बंडगर यांचा कार्यक्रम.

सोमवार, दि.७/१०/२४ रोजी संध्याकाळी ७ ते १० दांडियाचा कार्यक्रम होणार आहे.

मंगळवार, दि. ८/१०/२४ रोजी संध्याकाळी ९ ते १० जागरण गोंधळ.

बुधवार, दि. ९/१०/२४ रोजी संध्याकाळी ७ ते १० ह. भ. प. महादेव महाराज पळसदेवकर यांचे भारुड.

गुरुवार, दि. १०/१०/२४ रोजी सायंकाळी ६ ते १० महाप्रसाद.

शुक्रवार दि. ११/१०/२४ रोजी सायंकाळी ६ ते १० होम व गोंधळ कार्यक्रम.

शनिवार दि. १२/१०/२४ रोजी सायंकाळी ६ ते १० मिरवणूक सोहळा निघणार आहे.

या सर्व कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्रीमंत सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ महोत्सव समिती बुधवार पेठ, फलटण यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!