
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २४ मार्च २०२४ | फलटण |
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) केंद्र, फलटण आणि प.पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एकनाथ षष्ठी उत्सवानिमित्त फलटणमध्ये रविवार, दि. ३१ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता ह.भ.प. श्री. मंदार गोखले (युवा कीर्तनकार, पुणे) यांचे ‘नारदीय कीर्तन’ आयोजित केले आहे.
हे कीर्तन फलटण येथील प.पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिरात होणार असून या कीर्तनास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
