धर्मनगरी फलटणमध्ये ‘वात्सलय दिन’ उत्साहात साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २४ मार्च २०२४ | फलटण |
तीर्थरक्षा शिरोमणी परमपूज्य आचार्य आर्यनंदी महाराजांचा ११७ वा जन्म जयंती सोहळा फलटणमधील श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर येथे अतिशय आनंदात, उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष व भाजपा फलटण शहराध्यक्ष श्री. अनुप भैय्या शहा व चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरचे विश्वस्त राजेंद्रभाई कोठारी यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले.

यावेळी डॉ. सूर्यकांत दोशी, दैनिक ‘आदेश’चे संपादक श्री. विशालभाई शहा, अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. श्रीपाल जैन, उपाध्यक्ष श्री. रमणलालजी रणदिवे, सचिव श्री. श्रीकांत सवळे तसेच संगिनी फोरम अध्यक्षा सौ. अपर्णा जैन, श्री. सुभाष खडके, श्री. सुनील रत्नपारखी, श्री. शरद सवळे, श्री. राजेंद्र सवळे, चि. पियुष सवळे, श्री. सागर समर्थ, चि. श्रेयांश जैन व सैतवाल जैन, समाज श्रावक, श्राविका बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रारंभी परमपूज्य आचार्य आर्यनंदी महाराजांची अष्टद्रव्य पूजा करून महाराजांची आरती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष श्रीपाल जैन यांनी महाराजांच्या कार्याबद्दल विस्तृत माहिती सादर केली. श्री. चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरचे विश्वस्त श्री. उदय काका शहा यांनी फलटणमध्ये महाराजश्रींचा चातुरमास झाल्याचे नमूद करून महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर उपस्थित श्रावक-श्राविकांना उसाच्या रसाचे वाटप करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!