दैनिक स्थैर्य | दि. २३ मार्च २०२४ | फलटण |
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, फलटण विभागाकडून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासनिमित्त रविवार, दि. २४ मार्च २०२४ रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत फलटणमधील महाराजा मंगल कार्यालयात रक्तदान महायज्ञ म्हणजे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान महायज्ञात रक्तदान करणार्या प्रत्येक दात्याला ‘छावा’ कादंबरी भेट देण्यात येईल. या रक्तदानात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, फलटण विभाग यांच्याकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी महेश पवार (९५०३६५७९३३), विक्रम माने (९०९६६०८०६१), आदित्य गायकवाड (९८३४७९९४९५) यांच्याशी संपर्क साधावा.