छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिन वर्ष सोहळ्यानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. विजय ककडे यांचे व्याख्यान

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १० जून २०२३ । मुंबई । राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक दिन वर्ष सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती’ या विषयावर अर्थतज्ज्ञ प्रा.डॉ. विजय ककडे यांचे व्याख्यान उद्या प्रसारित होणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून हे व्याख्यान शनिवार दि.10 व सोमवार दि. 12 जून 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!