
दैनिक स्थैर्य । दि. १६ ऑगस्ट २०२२ । भुसावळ । स्थानिक आठवडे बाजार भागातील चौका मध्ये आयोजित कार्यक्रमात विविध आयुर्वेदिक, डेरेदार सावली देणारे, आॅक्सिजन देणारे असे विविध रोपांचे वाटप हाॅकर्स व ग्राहकांना वाटप करण्यात आले.
प्रसंगी हर घर झेंडा या धर्तीवर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे वाचविणे, जंगल वाचविने काळाची गरज आहे यासाठी वृक्ष संवर्धन फार आवश्यक आहे म्हणून घरोघरी एक झाड़ असावे याकरीता सखी श्रावणी संस्थेने अमृत महोत्सवाचे औचित्य व उद्दीष्ट समोर ठेवून ७५ वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले . तसेच जे नागरिक वृक्षसंवर्धन करतील त्यांनाच रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच पुढील वर्षी त्यांचा मानपत्र देवूंन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संस्था अध्यक्षा राजश्री नेवे यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजश्री नेवे , पत्रकार उज्वला बागुल , कामिनी नेवे, संगिता भामरे, अंजली नेवे, माया चौधरी, सीमा नेवे, वंदना झांबरे, भाग्यश्री नेवे, कल्पना बुंदेले, मेघा नेवे, स्मिता माहूरकर, यांचेसह महिला व नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी सखी श्रावणी संस्थेचे सदस्यांसह नाना पाटिल सर व सुर्यकांत दादा, हाॅकर्स झोनचे अध्यक्ष रवि सपकाळे व संपुर्ण हाॅकर्स संघटना सदस्यांचे अनमोल सहकार्य लाभले.