श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १६७ व्या प्रकट दिनानिमित्त २३ मार्च रोजी नवलबाई मंगल कार्यालयात विविध धार्मिक कार्यक्रम


दैनिक स्थैर्य | दि. १८ मार्च २०२३ | फलटण |
श्री स्वामी समर्थ महाराजांचा १६७ वा प्रकट दिन गुरुवार, दि.२३ मार्च रोजी संपन्न होत असून यानिमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, बुधवार पेठ, शिवाजी रोड फलटण यांच्यावतीने नवलबाई मंगल कार्यालय येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार, दि.२३ मार्च रोजी श्री स्वामी प्रकटदिनी नवलबाई मंगल कार्यालय, फलटण येथे सकाळी ८ वाजता ‘श्रीं’चा अभिषेक, महाआरती, मंत्र, नामस्मरण, वास्तूशास्त्र, पितृशास्त्र, संख्याशास्त्र, शिवसरोदय शास्त्र याविषयी प. पू. राजनकाका देशमुख महाराज यांचे प्रवचन होणार आहे.

सदर कार्यक्रमास व्यसनमुक्त संघटनेचे प. पू. धैर्यशीलभाऊ देशमुख, प. पू. नवनाथ महाराज (शेरेचीवाडी) हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सायं. ६.३० वाजता आरती व नंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!