मुधोजी महाविद्यालयात ‘घरगुती गॅस वापरातील समस्या व उपाय’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न


दैनिक स्थैर्य | दि. १८ मार्च २०२३ | फलटण |
मुधोजी महाविद्यालयात गुरुवार, दि. १६ मार्च रोजी आपत्ती व्यवस्थापन समिती व भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘घरगुती गॅस वापरातील समस्या व उपाय’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत एच.पी. गॅस एजन्सी, फलटणचे श्री. मिलिंद लाटकर व त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रात्यक्षिक सादरीकरण करून तसेच माहितीपत्रकांच्या सहाय्याने आपल्या दैनंदिन वापरामध्ये असणार्‍या घरगुती गॅसच्या संबंधित अडचणी व समस्या उद्भवल्यास त्यावर कशा पद्धतीने त्वरित उपाययोजना कराव्यात व होणारा संभाव्य धोका टाळावा, यासंदर्भाचे सखोल असे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच.कदम सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या कार्यक्रमासाठी आय.क्यू.ए.सी. व भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. टी.पी.शिंदे सर यांचे विशेष सहकार्य लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भूगोल विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक यांचेदेखील मोलाचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. मधील जवळपास ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.


Back to top button
Don`t copy text!