कै. विठ्ठलराव निंबाळकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हणमंतवाडी येथील वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १८ मार्च २०२३ | फलटण |
राजाळे गावचे माजी पोलीस पाटील कै. विठ्ठलराव गुलाबराव निंबाळकर यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था हणमंतवाडी येथील विद्यार्थ्यांना श्री. भालचंद्र निंबाळकर व श्री. नीळकंठ निंबाळकर सर यांच्या कुटुंबियांच्या वतीने पापमोचनी एकादशीनिमित्त फराळ, केळी, इ. पदार्थांचे वाटप करण्यात आले.

यावेळी श्री. कुंभार महाराज यांनी अन्नदान महत्त्व विषद केले. कार्यक्रमास नीळकंठ निंबाळकर सर, प्रवीण निंबाळकर सर, संतोष कुंभार, सागर भोईटे उपस्थित होते. सर्वांचे स्वागत व सत्कार संस्थेचे संस्थापक श्री. कुंभार महाराज यांनी केले.

Back to top button
Don`t copy text!