‘ओल्ड मॉन्क’च्या विक्रीवरील बंदी कायम; हायकोर्टाचा तातडीने दिलासा देण्यास नकार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

महाराष्ट्रात ओल्ड मॉन्कच्या विक्रीवरील बंदीला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला असून कंपनीला कोणताही अंतरिम दिलासा मिळालेला नाही.

स्थैर्य, सातारा, दि. ०७ सप्टेंबर : ‘ओल्ड मॉन्क’ रमच्या महाराष्ट्रातील विक्रीवरील बंदीला तातडीने स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निर्मिती करणाऱ्या मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर ब्रुअरीज कंपनीने FSSAI च्या आदेशाला आव्हान देत विक्री सुरू ठेवण्याची परवानगी मागितली होती. मात्र, न्यायालयाने कंपनीला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्याने राज्यातील विक्रीवरील निर्बंध कायम राहिले आहेत.

सुधारित लेबल आणि FSSAI चा आक्षेप

सुनावणीदरम्यान कंपनीच्या वतीने सुधारित लेबलचे तीन नमुने न्यायालयात सादर करण्यात आले. आक्षेप असलेली माहिती बदलण्याची तयारी कंपनीने दर्शवली आहे. खोपोली येथील प्रकल्पाच्या तपासणीनंतर उत्पादनात न्यूट्रल स्पिरिटसोबत रम फ्लेवरचा वापर होत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे याला थेट ‘रम’ म्हणून विकता येईल का, असा प्रश्न एफडीएने उपस्थित केला आहे.

कोर्टाचे निरीक्षण आणि पुढील सुनावणी

बाटलीवरील मजकुरामुळे ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते का, याबाबत न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ सप्टेंबर २०२६ रोजी होणार असून केंद्र सरकार आणि FSSAI ची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!