समाज कल्याण विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणार प्रशिक्षण


दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२१ । सातारा ।  समाज कल्याण विभागामध्ये प्रशासकीय गतिमानता व सुधारणा करण्यासाठी विविध संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी राज्य शासनाच्या यशदा व बार्टीच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पुढकार घेतला असून कोविडच्या परिस्थितीमुळे ऑनर्लान पद्धतीने लवकरच प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. समाज कल्याण विभागाचे कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी समाज कल्याण विभागाने कर्मचाऱ्यांसाठी कौशल्य विकास, झिरो पेंडन्सी, विविध संवर्गाचे प्रशिक्षण यासारखे नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. 

स्पर्धेच्या तंत्रज्ञानाच्या युगात अधिकारी, कर्मचारी यांना देखील काळानुरुप आपल्या कामकाजामध्ये बदल करणे आवश्यक असून त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच त्याचे प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याची बाब लक्षात घेऊन त्या दृष्टीनेही पावले उचचली आहेत.


Back to top button
Don`t copy text!