दैनिक स्थैर्य | दि. २८ सप्टेंबर २०२४ | फलटण | फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी ३ कोटी ८३ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून यासोबतच कुसूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीसाठी १ कोटी रुपये मंजूर झाले असून त्याला प्रशासकीय मान्यता सुद्धा प्राप्त झाली असल्याची माहिती विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी WhatsApp स्टेटस द्वारे दिली आहे.