मुधोजी हायस्कूलमध्ये २९ सप्टेंबरला भव्य मोफत स्त्रीरोग निदान व उपचार शिबिर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २८ सप्टेंबर २०२४ | फलटण |
कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड व कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत स्त्रीरोग निदान व उपचार शिबिर रविवार, दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी दु. १२.१५ वाजता मुधोजी हायस्कूल, फलटण येथे आयोजित केले आहे.

या शिबिरात स्त्रीरोगासंबंधीची तपासणी मोफत करण्यात येतील.तसेच गरज असलेल्यांची मॅमोग्राफी (स्तनतपासणी) आणि गर्भाशय मुखाची पॅप्समेअर तपासणी मोफत करण्यात येईल व शासकीय योजनेनुसार यापुढील तपासण्या, उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत अथवा सवलतीने करण्यात येतील.

यावेळी डॉ. सुरेशबाबा भोसले (कुलपती, कृष्णा विश्वविद्यापीठ, कराड) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. डॉ. वैशाली मोहिते (डीन, नर्सिंग कॉलेज), डॉ. अपर्णा पतंगे (एमडी, मेडिसीन), डॉ. मनिषा लद्दड (एमडी, स्त्रीरोग तज्ज्ञ), डॉ. प्रणिता पाटील (मेडिकल ऑफिसर) हे स्वतः स्त्रीरोगासंबंधी महिलांना मार्गदर्शन करणार आहेत.

सर्व गरजू महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जि.प.चे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी डॉ. विश्वास पाटील (कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, मो. ९८८१४४७३५६), श्री. महेश ढवळे (समन्वयक, एपीएमसी आरोग्य समिती मो. ९८२२३३२४४४), श्री. शंकरराव सोनवलकर (सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती मो. ९६२३८८९९८८) यांच्याशी संपर्क साधावा.

शिबिरासाठी येताना संबंधितांनी सध्या चालू असणार्‍या औषधोपचारांची माहिती व रिपोर्ट सोबत आणावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!