न्यूट्रिलिशियसने आपली लीडरशीप टीम केली अधिक प्रबळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० जानेवारी २०२३ । मुंबई । आपली लीडरशीप टीम अधिक प्रबळ करण्यासाठी भारतात दर्जेदार नट्स व ड्रायफ्रूट्स देणारे ऑनलाइन व्यासपीठ न्यूट्रिलिशियसने संचालकपदी सौरभ वालकर यांची नियुक्ती केली आहे. ते बाजारपेठेतील पोकळींना ओळखतील आणि कंपनीचा उत्पादन पोर्टफोलिओ वाढवण्याप्रती योगदान देतील अशा उत्पादन विकासामध्ये मार्गदर्शन करतील, तसेच त्यांना बाजारपेठेसाठी आवश्यक योग्य उत्पादन उत्तमरित्या समजण्यामध्ये मदत करतील.

न्यूट्रिलिशियसचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक रेड्डी डी म्हणाले, ‘‘आम्हाला न्यूट्रिलिशियसच्या लीडरशीप टीममध्ये सौरभचे स्वागत करताना आनंद होत आहे. त्यांना क्रीडामधील त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून आरोग्य व पोषणामध्ये व्यापक ज्ञान व अनुभव आहे. आम्हाला आमच्या टीममध्ये त्यांच्यासारखे विचारवंत प्रमुख असण्याचा आनंद होत आहे आणि ते त्यांच्या सद्गुणांसह कंपनीच्या विकासाला मार्ग दाखवतील, अशी आम्ही अपेक्षा करतो.’’

सौरभ वालकर म्हणाले, ‘‘आपल्या उत्पादनांसह आरोग्यदायी देश निर्माण करण्यासाठी कार्यरत असलेल्या कंपनीत सामील होणे अत्यंत सन्माननीय आहे. भारतातील आरोग्याविषयी जागरूक व्यक्तींसाठी कंपनीला नाविन्यपूर्ण उत्पादने विकसित करण्यात मदत करण्यासाठी मी आरोग्य व पोषणसंबंधित माझ्या कौशल्याचा उपयोग करण्यास उत्सुक आहे. चांगल्या आरोग्याला चालना देण्याच्या कंपनीच्या संकल्पाला अधिक दृढ करण्याप्रती मी माझे योगदान देऊ इच्छितो.’’

मुंबईमध्ये जन्मलेले व मोठे झालेले सौरभ यांनी लहान वयातच क्रिकेट खेळायला सुरूवात केली. ते मुंबई क्रिकेट असोसिएशनअंतर्गत क्लब्ससाठी क्रिकेट खेळले आहेत आणि सर्वात तरूण क्रिकेट विश्लेषक आहेत. शिक्षणाने अभियंता आणि व्यवसायाने खेळाडू असलेले सौरभ यांनी कामगिरी विश्लेषक म्हणून काम करताना क्रिकेटमध्ये एक दशकाहून अधिक काळ घालवला आहे.


Back to top button
Don`t copy text!