दैनिक स्थैर्य । दि. ३० जानेवारी २०२३ । सासकल । फलटण तालुक्यातील सासकल येथे सासकल ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी आयुक्त पुणे यांच्या आदेशाने व उपजिल्हाधिकारी निर्गमित केलेल्या आदेशान्वये उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा अर्चना वाघमळे यांनी नेमलेल्या त्रस्त समितीमार्फत चौकशी सुरू असताना सन २०२० मध्ये फक्त कागदोपत्री खर्च केलेल्या वस्तू व त्यात केलेला भ्रष्टाचार उघड होईल व त्यानुसार कारवाई होईल हे लक्षात येताच प्रशासकीय अधिकाऱ्याच्या संगनमतांनी ग्रामपंचायत सरपंच व त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मिळून रात्रीच्या अंधारात घसरगुंडी, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचे गणवेश व खेळणी आणून दिली व हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.
सन २०२० मध्ये प्रत्यक्ष कागदोपत्री रंगवून खर्च केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी माण तालुक्याचे गटविकास अधिकारी एस बी पाटील हे चौकशी करत आहेत. सदर प्रकरणाची चौकशी गटविकास अधिकारी माणचे एस बी पाटील यांनी दिनांक १२/१०/२०२२ रोजी तक्रारदार म्हणून सासकल जन आंदोलन समिती व ग्रामस्थ यांचे जबाब नोंदवले व त्यांचे म्हणणे समजून घेतले. त्यानंतर दिनांक १६/११/२०२२ रोजी प्रत्यक्ष कागदपत्राची पडताळणी करून प्रथमदर्शनी भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध होत आहे हे ओळखून सदर प्रकरणाचा अहवाल २ डिसेंबरला देतो असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर तक्रारदार सासकल जन आंदोलन समिती व ग्रामस्थांनी २६ जानेवारी २०२३ रोजी दिवशी मुंडण व उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर चौकशी समितीचे प्रमुख एस बी पाटील यांनी १९/१/२०२३ रोजी सदरील व्यक्तींना चौकशी कामे ज्या दिवशी त्यांना बोलवले त्याच्या आदल्या रात्री घसरगुंडी रात्रीच्या अंधारात आणून गणवेश, खेळणी सुद्धा देण्यात आली.
वास्तविक पाहता सदर वस्तू या सन २०२० मध्ये देणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले वास्तविक पाहता अहवाल २ डिसेंबरला न दिल्यामुळे वारंवार अहवालाची मागणी केली असता कागदपत्रे मिळाली नाहीत ती कागदपत्रे मिळाले की अहवाल देतो असे खोटे सांगून सदर प्रकरणी आज अखेर अहवाल दिला नाही. मात्र दरम्यानच्या काळामध्ये ज्या गोष्टींमध्ये भ्रष्टाचार झाला आहे त्या वस्तू मात्र रात्रीच्या अंधारात व परस्पर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल व अंगणवाडी या ठिकाणी दिल्या जात आहेत. त्यामुळे सदर प्रकरण दडपण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व संबंधित भ्रष्टाचार करणारे ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक व तत्कालीन सरपंच हे प्रयत्न करत आहेत.