आता यूपीआय व्यवहार करणे झाले सोपे; कधीही नाही होणार फेल


दैनिक स्थैर्य । दि. १६ मार्च २०२३ । मुंबई । पेटीएमने नुकतीच यूपीआय लाईट सेवा लॉन्च केली जी वापरकर्त्यांना एकाच क्लिकमध्ये पेमेंट्स करण्याची सुविधा देते. भारतातील स्वदेशी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (पीपीबीएल)देखील यूपीआय लाइटसह कार्यरत झाली आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना कधीच अयशस्वी न होणाऱ्या अत्यंत गतीशील यूपीआय पेमेंट्सची सुविधा मिळाली आहे. वापरकर्ते विनासायास व्यवहारांसाठी त्यांच्या पेटीएम पेमेंट्स बँक बचत खात्यांशी लिंक केलेले त्यांचे यूपीआय लाइट अकाऊंट्स कार्यान्वित करू शकतात. वापरकर्ते एकाच क्लिकसह जवळपास २०० रूपयांपर्यंत जलद व एकसंधी पेमेंट्स करू शकतात.

पेटीएम पेमेंट्स बँकेने आज पेटीएम यूपीआय लाइटवर २ दशलक्षांहून अधिक वापरकर्ते असण्याची घोषणा केली आहे. बँकेने पेटीएम अॅपच्या माध्यमातून पेटीएम यूपीआय लाइटसाठी अर्ध दशलक्षहून अधिक दैनंदिन व्यवहारांची नोंद केली आहे. यामधून या सेवेची वाढती लोकप्रियता दिसून येते.

पेटीएम यूपीआय लाइट सिंगल-क्लिक पेमेंट्स सुविधा देते, जी पीक व्यवहार कालावधीदरम्यान बँकांचे यशस्वी दरसंदर्भात समस्या असताना देखील कधीच अयशस्वी होत नाही. कार्यान्वित झाल्यानंतर यूपीआय लाइट जवळपास २०० रूपयांपर्यंतचे त्वरित व्यवहार करण्याची सुविधा देते, ज्यामधून एकसंधी अनुभव मिळतो. दिवसातून दोनदा अधिकतम २,००० रूपये यूपीआय लाइटमध्ये भरता येऊ शकतात, ज्यामुळे दररोज एकूण ४,००० रूपयांपर्यंत मूल्याचा वापर करता येऊ शकतो.

पेटीएम यूपीआय यशस्वी पेमेंट्ससाठी आधुनिक यूपीआय लाइट तंत्रज्ञानाद्वारे समर्थित आहे आणि ३-स्तरीय बँक-ग्रेड सुरक्षितता देते. तसेच यूपीआय लाइटचा वापर करत केलेले पेमेंट्स पासबुकमध्ये दिसणार नाहीत, ज्यामुळे वापरकर्त्याला अनक्लटर्ड बँक स्टेटमेंट मिळते. यूपीआय लाइट बॅलन्समध्ये पैसे भरताना फक्त एकाच एंट्रीची नोंद होते.

पेटीएम बँक यूपीआयमधील सर्वात मोठी संपादनकर्ता व लाभदायी बँक म्हणून पहिल्या क्रमांकाची बँक असण्यासोबत आघाडीची रेमिटर बँक देखील आहे. यूपीआय लाइट लॉन्च करणारी पहिली पेमेंट्स बँक म्हणून बँकेने आपल्या वापरकर्त्यांसाठी तंत्रज्ञान-नेतृत्वित नवोन्मेष्कारी सोल्यूशन्स निर्माण करण्याची परंपरा कायम ठेवली आहे आणि दैनंदिन व्यवहारांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणत आहे.

पेटीएम यूपीआय लाइट कशाप्रकारे सेट अप करावे?

१. पेटीएम अॅप सुरू करा आणि ‘यूपीआय लाइट’वर क्लिक करा.

२. यूपीआय लाइटसाठी पात्र असलेला ‘बँक अकाऊंट’ निवडा आणि ‘प्रोसिड’वर टॅप करा.

३. ‘अॅड मनी टू अॅक्टिव्हेट यूपीआय लाइट’ पेजवर यूपीआय लाइटमध्ये भरावयाची रक्कम प्रविष्ट करा.

४. हे केल्यानंतर वापरकर्ते पेटीएम यूपीआय लाइटचा वापर करण्यास सुरूवात करू शकतात.


Back to top button
Don`t copy text!