आता कोरोनाशीच दोन हात


स्थैर्य, सातारा, दि. २३ : सार्‍या जगाची झोप उडवून जनजीवन ठप्प करणार्‍या कोरोनाचा संसर्ग देशात आणि राज्यात वाढतच चालला आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा दर दुप्पट आहे.  मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळले असून त्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड आणि पुणे, नाशिक, मालेगावं यासह मोठमोठ्या शहरांचा नंबर लागतो आहे.  मुंबईसह राज्यात रुग्णांमध्ये झालेली वाढ रोखली जात नसून मुुंबईतच दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच आहे. काल शुक्रवारीच मुंबईत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या सत्ताविस हजारांपेक्षा पुढे गेली आहे. वाढते रुग्ण आणि मृत्यूंचे प्रमाण यामुळे  सद्य परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. या परिस्थितीत वैद्यकीय उपचारांबरोबरच सामाजिक आरोग्य, परिसर स्वच्छतेबद्दलचे प्रखर कर्तव्यभानच कोरोना आणि तत्सम साथींच्या आक्रमणापासून आपला बचाव करू शकते. कोरोना रोखण्यासाठी स्थापन झालेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ.सजय ओक यांनी सांगितले की, राज्यात शुक्रवारी  एका दिवसांत आजवरच्या सर्वाधिक रुग्णांची वाढ झालेली असून येत्या दोन तीन दिवसांत हा आकडा पन्नास हजारच्या आसपास जाण्याची भिती आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वेगाने पसरु लागल्याने राज्य सरकारच्या चिंतेत भर पडली आहे.

दरम्यान पावसाळ्यात या कोरोना विषाणूंची संख्या वाढेल असे स्पष्ट संकेत डॉ.संजय ओक यांनी दिले आहेत. या संकटावर सर्वतोपरी मात करण्याचे प्रयत्न सुरु आहेत परंतु लोकांची मानसिकताही बदलण्याची आवश्यकता आहे. कोरोनावर मात करुन बरे झालेल्या रुग्णांविषयी त्याच्या परिसरातील लोकांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. आलेले संकट मोठे आहे त्यामुळे सर्वांचीच त्रेधातिरपीट उडत आहे. रुग्णांचा आकडा वाढत असला तरी तो विस्फोटक निश्‍चितच नाही. ईटली स्पेन मध्ये जसे झाले तसे आपल्याकडे झालेले नाही असे डॉ. ओक यांनी स्पष्ट केले. कारण आपल्या आरोग्य यंत्रणेने चांगले काम केलेले आहे. कोविडबाबत म्हणावी तेवढी साक्षरता आपल्याकडे झालेली नाही. सातव्या दिवसानंतर रुग्णावरील कोविड क्षीण झालेला असतो अशा गोष्टी लोकांना माहित नाहीत. अशा रुग्णांकडून रोगाचा प्रसार होण्याचे प्रमाण खूपच कमी झालेले असते.  आणखी एक कटू सत्य अधोरेखित झाले आहे. ते म्हणजे स्वत:च्या आणि परिसराच्या आरोग्याविषयी तुम्हा-आम्हांसकट समाजाच्या सर्व घटकांमध्ये आढळणारी कमालीची बेफिकीरी. कुठल्याही साथीने, संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले, रुग्णालयांमधील, डॉक्टरांकडील, पालिकेच्या दवाखान्यांमधील रुग्णसंख्या वाढू लागली की भारतातील अतिशय कमकुवत सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर खापर फोडून मोकळे होण्याचा सर्वाधिक यशस्वी मार्ग पब्लिककडून स्वीकारला जातो.

संबंधित यंत्रणांमध्ये जबाबदारी झटकण्याचा, दुस-यांकडे बोट दाखवण्याचा ब्लेम गेम सुरू होतो. एरव्ही मलेरिया,डेंग्यू वा तत्सम एखादी साथ डोके वर काढते, एखाद्या विशिष्ट भागात फैलावते आणि ब्लेमगेमनंतर कामाला लागलेल्या यंत्रणांच्या तात्पुरत्या उपायांनी का होईना काही काळाने आटोक्यातही येते हे आपले सुदैवच. इतके झाल्यावर पुन्हा सगळे मात्र यातून योग्य तो धडा घेत स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नाही. सध्या राज्यात कोरोनाची साथ ज्या वेगाने फैलावली आहे ते पहाता ही बेफिकीरी, ही बेजबाबदारी, स्वत:च्या पलिकडे न पहाण्याची आपमतलबी, स्वार्थी वृत्ती आता फार काळ परवडणारी नाही हे आपण सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवे. मृत्यू कोणालाही चुकलेला नाही हे चिरंतन सत्य असले तरी आपल्याच बेफिकीरीने ओढवलेल्या रूपात मृत्यूच्या अशुभ सावलीने स्पर्श करावा आणि त्यांचा अंत व्हावा यासारखे दुसरे दुर्दैव ते कोणते?  कोरोना साथीने  भारतासारख्या बहुस्तरीय समाजरचनेतील गरीब-श्रीमंत असा भेद, जातीपातीच्या तटभिंतीही ढासळवून टाकल्या आहेत. मुंबईतील डेंग्यूचा फैलाव हा प्रामुख्याने  मध्यमवर्गीय तसेच दाटीवाटीच्या  वस्त्यांमध्ये असल्याचे महापालिकेचे आणि आरोग्य यंत्रणांचे निरीक्षण आहे. 

या माहितीला आणि निरीक्षणांना मिळणारा दुजोरा धक्कादायक आणि  उच्चभ्रू वस्त्यांना खडबडून जागे करणारा आहे. जीवनशैली-आहारातील बदल, महागडी औषधे, उपचार-शल्यक्रियांसाठी  परदेशाच्या वा-या यामुळे उच्च वर्गातील बरचसे आजार-विकार आटोक्यात येत असले तरी संसर्गजन्य साथींपासून, आपल्याच निष्काळजीपणामुळे उद्भवणा-या आजारांपासून बंगले, गगनचुंबी इमारतींच्या सिमेंट-काँक्रिटच्या भिंती या वर्गाला वाचवू शकत नाहीत. धारावी असो वा मलबार हिल वा पेडर रोड यापैकी कुठल्याही भागातील रहिवाशांचा या साथीच्या आजारांपासून बचाव सध्याच्या वातावरणात जवळपास अशक्य आहे. तिरुवनंतपूरमपासून दिल्लीपर्यंत आणि कोलकातापासून मुंबईपर्यंत सर्व देशभर सध्या   रुग्ण आढळत आहेत.   वस्त्यांमध्ये असलेल्या डॉक्टरांकडे डेंग्यूचे रुग्ण गेल्या महिनाभरात वेगाने वाढू लागले आहेत. हीच परिस्थिती पुण्यात, पिंपरी-चिंचवड येथे आहे, नाशिकलाही आहे.  रुग्ण विचारात घेतले तर   हा फैलाव अधिक भयावह स्वरूप धारण करणारा ठरला आहे. राज्यात यंदा मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळले असून त्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड आणि पुण्याचा नंबर लागतो. यामुळे पावसाळ्यापुर्वीच साथ आटोक्यात न आल्यास गुंतागुंत वाढू शकते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

हे सगळे विस्ताराने सांगण्याचे कारण इतकेच की केवळ सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्याविषयी पूर्वखबरदारी घेऊन किलर स्टेज टाळता येणे शक्य आहे. फैलावणारी जगातील सर्वाधिक घातकी साथ’,  फक्त वैद्यकीय उपचार ही साथ आटोक्यात आणू शकत नाहीत वा रुग्णांचा बचावही करू शकणार नाहीत. विख्यात कवी-गीतकार गुलजार हे काही ठरावीक काळानंतर स्वखर्चाने ते रहात असलेल्या परिसरात साफसफाई, धूरफवारणी आदी करून घेत असतात. गुलजार यांच्यासारखेच सामाजिक आरोग्य, परिसर स्वच्छतेबद्दलचे प्रखर कर्तव्यभानच   साथींच्या आक्रमणापासून आपला बचाव करू शकते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!