
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १६ जानेवारी २०२२ । फलटण । फलटण शहरामध्ये मंगळवार दि. १८ जानेवारी रोजी जलशुद्धीकरण केंद्रावर तांत्रिक कामे नियोजित आहेत. त्यामुळे मंगळवार दि. १८ जानेवारी रोजी संपूर्ण फलटण शहरामध्ये संपूर्ण पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी दिली.
तरी याबाबत फलटण शहरातील नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे, असेही फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी आवाहन केले.
