मुधोजी हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश


दैनिक स्थैर्य । दि. १६ जानेवारी २०२२ । फलटण । फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 2021 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. यामध्ये अक्षय राजन पोतदार या विद्यार्थ्याने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी 270 गुण मिळवून राज्याच्या शिष्यवृत्ती यादीमध्ये 12 वा क्रमांक मिळवला. तसेच सार्थक सतीशकुमार गावडे या विद्यार्थ्याने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी 288 गुण मिळवून राज्याच्या शिष्यवृत्ती यादीमध्ये 24 वा क्रमांक मिळवला व तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला.

सदरील विद्यार्थ्यांच्या उज्वल यशाबद्दल विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले. प्राचार्य बाबासाहेब गंगावणे, उपप्राचार्य ए. वाय. ननवरे, पर्यवेक्षक टी. एम. गोडसे, एस. एम. काळे, एल .के. भोसले यांची उपस्थिती होती. तसेच इयत्ता पाचवी चे शिष्यवृत्ती विभागाचे प्रमुख उमेश शिंदे व गणेश कचरे, इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती विभागाच्या प्रमुख सौ. भावना भोईटे यादेखील उपस्थित होत्या.

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये 6 विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादी मध्ये निवड झाली आहे. तन्मय संभाजी येळे (गुण – 248) जिल्हा गुणवत्ता यादीत 103 वा क्रमांक, आर्यन अरुण पवार (गुण – 244) जिल्हा गुणवत्ता यादीत 124 वा क्रमांक, कु. तन्मयी प्रवीणकुमार पांगे(गुण – 238) जिल्हा गुणवत्ता यादीत 144 वा क्रमांक, निखिल संदीप नेवसे (गुण – 234) जिल्हा गुणवत्ता यादीत 176 वा क्रमांक, आदिराज कार्तिक कुचेकर (गुण – 232) जिल्हा गुणवत्ता यादीत 186 वा क्रमांक.

इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 9 विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादी मध्ये निवड झाली आहे. वेदांत नरेश सोनगिरे (गुण-254) जिल्हा गुणवत्ता यादीत 17 वा क्रमांक, भावेश भरत शिंदे (गुण-254) जिल्हा गुणवत्ता यादीत 18 वा क्रमांक , साईश मारुती दिवेश (गुण-244) जिल्हा गुणवत्ता यादीत 35वा क्रमांक, मयंक मनिष जाधव (गुण-226) जिल्हा गुणवत्ता यादीत 71वा क्रमांक, सोहम सतीश कुमार पवार (गुण-218) जिल्हा गुणवत्ता यादीत 102 वा क्रमांक, चैतन्य सूर्यकांत भेस्के (गुण-216) जिल्हा गुणवत्ता यादीत 112 वा क्रमांक , अथर्व राज नामदेव गायकवाड (गुण-212) जिल्हा गुणवत्ता यादीत 129 व भाग क्रमांक, श्रीराज तानाजी काशीद (गुण-210) जिल्हा गुणवत्ता यादीत 136 वा क्रमांक.

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना खुंटे एम.पी., सौ गायकवाड ए.डी., सौ. थोरात मॅडम, मोहिते डी.एम., तोडकर एस.ए., शिंदे यु.डी., रोमन व्ही. एम, कदम एस .पी, मोरे एस .एम., सौ. बावकर एस एम, मुळीक डी.बी, सौ. सस्ते एस. एन., सौ. नाईक निंबाळकर ए. ए., सौ. आगवणे एस एस., सौ. मोहिते व्ही. एस., कुमारी घोलप एस .एस., श्रीमती मगर एन.पी. व सौ. बुचडे एल. यु. यांनी मार्गदर्शन केले.

तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना पवार आर. एम., पवार, माने व्ही.एम, घारगे डी .डी., निंबाळकर एस.जी., कुमारी देशमुख बी.व्ही., सौ. लामकाने, राऊत यांनी मार्गदर्शन केले.


Back to top button
Don`t copy text!