UP मध्ये निर्भयाची पुनरावृत्ती!:50 वर्षीय अंगणवाडी सेविकेची सामुहिक बलात्कारानंतर निर्घृण हत्या

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, दि.६: उत्तर प्रदेशच्या बदायूंमध्ये विकृतीचा कळस गाठणारी आणि निर्भयाची पुनरावृत्ती झाल्याची घटना समोर आली आहे. 50 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ही महिला अंग तिच्या शरीरात गंभीर जखमा झाल्याचे शवविच्छेदनात समोर आले आहे. पीडित कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही.

पोस्टमार्टेम अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार महिलेच्या गुप्तांगात रॉड खुपसण्यात आला होता. याशिवाय डावी बरगडी, पाय आणि फुप्फुसांना देखील गंभीर इजा पोहोचली होती. डावा पाय आणि बरगडी आतून तुटली होती. महिलेचा अति रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी या घटनेवर बरेलीचे ADGकडून रिपोर्ट मागवला आहे. तसेच UP STF यांनी देखील चौकशीचे आदेश दिले आहेत.

महिलेचा मृतदेह दारात फेकून पळ काढला – पीडित कुटुंबाचा आरोप

उघैती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. पीडितांचे म्हणणे आहे की, महिला नेहमीप्रमाणे रविवारी जवळच्या गावातील मंदिरात पूजा करण्यासाठी गेली होती. येथील मंदिरातील पुजारी, त्यांचा शिष्य आणि ड्रायव्हरने महिलेची बलात्कार करून हत्या केली. पुजारी रात्री उशिरा आपल्या जीपमध्ये आला आणि त्याने दाराजवळ महिलाच मृतदेह फेकून तेथून निघून गेला.

18 तासांनंतर शवविच्छेदनासाठी पाठविला मृतदेह

उघैतीचे पोलिस अधिकारी रवींदर प्रताप सिंह यांनी आमची तक्रार ऐकली नसल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. तसेच घटनास्थळाचा पंचनामा देखील केला नाही. घटनेनंतर सुमारे 18 तासांनी सोमवारी दुपारी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला, असे आरोपही केले आहे. या प्रकरणात एसएसपी संकल्प शर्मा यांचे म्हणणे आहे की आरोपींना अटक करण्यासाठी चार पथक पाठवली आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!