संतोष पोळ खून खटल्याची पुढील सुनावणी १३ जानेवारी 


स्थैर्य, सातारा, दि.४ : संतोष पोळ खून खटल्याची आज शनिवारी होणारी सुनावणी काही कारणाने स्थगित करण्यात आली असून ती १३ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली.
संतोष पोळ याने केलेल्या वाई हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. वाई पोलिसांनी या हत्याकांडाचा तपास केल्यानंतर संतोष पोळ याच्या विरोधात सातारा येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या हत्याकांडातील ज्योती मांढरे हि माफीची साक्षीदार झाली आहे. यापूर्वी १९  डिसेंबर २०२० रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान ज्योती मांढरे हिने संतोष पोळ याने माझ्यासमोर मंगला जेधे, सलमा शेख, भंडारी यांचा इंजेक्शन देऊन खून केला होता. या घटनेनंतर पोळ याने आनंद व्यक्त केला होता. संतोष पोळ याने बहुतेक खून सोने व पैशाच्या हव्यासापोटी केली असल्याची साक्ष न्यायालयात दिली होती. सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या हत्याकांडाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. या हत्याकांडाची पुढील सुनावणी आज शनिवार दि. २ जानेवारी रोजी घेण्यात येणार होती. मात्र काही कारणाने आजची सुनावणी स्थगित करण्यात आली असून ती १३ जानेवारी रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती न्यायालयातील सूत्रांनी दिली.

Back to top button
Don`t copy text!