नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनो मिळालेल्या संधीचं सोनं करा : श्रीमंत रामराजे


स्थैर्य, फलटण, दि. २७ : फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील अनपटवाडी ग्रामपंचायतीच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. आता मिळालेल्या संधीचं सोनं करा, असे आवाहनही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर केलले आहे.

फलटण – कोरेगांव विधानसभा मतदार संघातील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या अनपटवाडी ता. कोरेगांव येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत राजे गटाने ९-० असा दणदणीत विजय मिळवून सत्तांतर घडविले आहे. यानिमित्त सर्व सदस्यांचा महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी नूतन ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन केले.

यावेळी अनपटवाडी ग्रामपंचायतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत राजे गटाचे विजयी उमेदवार गजानन शंकर बोबडे, सौ.पुजा गणेश बोबडे, सौ.भारती तात्यासो अनपट, सौ.ललित ज्योतीराम मुळीक, सौ.विलास रामचंद्र धर्माधिकारी, सौ.रुपाली प्रशांत मुळीक, रमेश कुंडलीक भागवत, सौ.राणी धनंजय भागवत, सौ.वंदना सुर्यकांत रानभरे यांच्यासह अनपटवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!