घर, ऑफिस, फ्लॅट किंवा गाडी सॅनिटाईझ करण्यासाठी नूतन सॅनिटायझर मशीन उपयुक्त : श्रीमंत रामराजे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, फलटण, दि. २० : कोरोना व्हायरसपासून स्वतःचा व कुटुंबीयांचा बचाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना तसंच आरोग्य संस्थांकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शक सूचना वेळोवेळी जारी करण्यात येतात. या सूचनांनुसार मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, हँड व वस्तू सॅनिटायझकरणे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणे इत्यादी गोष्टींचाही समावेश आहे. या सर्व सूचनांचं योग्य पद्धतीनं पालन करत करणे गरजेचे आहे. आपले घर, ऑफिस सॅनिटाईझ करण्यासाठी किंवा चारचाकी गाडी सॅनिटाईझ करण्यासाठी हे मशीन उपयुक्त ठरणार आहे, असे मत विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी व्यक्त केले.

आपले घर, ऑफिस, फ्लॅट किंवा गाडी सॅनिटाईझ करून मिळण्यासाठी फलटण येथील नितीन चांडक यांनी सदरील मशीन घेतलेले आहे. खास फलटण तालुक्यातील नागरिकांसाठी ह्या मशीनद्वारे अल्पदरामध्ये आपले घर, ऑफिस, फ्लॅट किंवा गाडी सॅनिटाईझ नितीन चांडक हे करून देणार आहेत. आपले घर, ऑफिस, फ्लॅट किंवा गाडी सॅनिटाईझ करण्यासाठी 9503984898 ह्या नंबरवर नितीन चांडक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन निंभोरे गावचे उपसरपंच मुकुंद रणवरे यांनी केलेले आहे.

Back to top button
Don`t copy text!