माढा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या या कार्यकर्त्याने दाखल केला उमेदवारी अर्ज; अधिकृत उमेदवारी बाबत नाराजी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 19 एप्रिल 2024 | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये आयात केलेल्या उमेदवाराला लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातील कार्यकर्ते नाराज झाले असून या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आपण उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खंदे समर्थक नंदकुमार मोरे यांनी दिली.

माढा लोकसभा मतदारसंघांमधून सोलापूर येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी नंदकुमार मोरे बोलत होते. यावेळी फलटण तालुक्यातील महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे खंदे समर्थक उपस्थित होते.

फलटण तालुक्यातील महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाला व कार्यकर्ते यांना विश्वासात घेतले जात नाही. फलटण तालुक्यातील अनेक मतदार याच्या आग्रहाखातर म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावेळेस फलटण तालुक्यातील अनेक समूहातील घटकांनी आनंद व्यक्त केला आहे; असे मत नंदकुमार मोरे यांनी यावेळी व्यक्त केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!