नरेंद्र मोदी म्हणाले- सरकारने शेतकऱ्यांना दिलेले प्रस्ताव आजही कायम आहेत


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.३०: केंद्र सरकारने शनिवारी सर्व पक्षांसमोर बजेट सत्राचा अजेंडा मांडला. यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्ष असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलेले प्रस्ताव आजही कायम आहेत. कोणत्हा मुद्दा चर्चेतून सोडवला जाऊ शकतो.

सूत्रांनी सांगितल्यानुसार, मोदी पुढे म्हणाले की, मी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या शेतकऱ्यांसोबत झालेल्या चर्चेतील ठळक मुद्दे मांडू इच्छितो. तोमर म्हणाले होते की, आमची चर्चा अखेरपर्यंत झाली नाही, पण शेतकऱ्यांना प्रस्ताव दिला आहे. तसेच, तोमर तुमच्यासाठी कधीही फोनवर बोलण्यास तयार असतील. सरकार शेतकऱ्यांचे मुद्दे सोडवण्याचा पुर्ण प्रयत्न करत आहे.

खरत, सर्वपक्षीय बैठक बजेट सत्र सुरू होण्यापूर्वी बोलावली जाते, पण यावेळेस सेशन सुरू झाल्यानंतर ठेवण्यात आली. बजेट सत्राची सुरुवात शुक्रवारी झाली.

विरोधकांना शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा हवीये

दरम्यान बैठकीत विरोध पक्ष शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करू शकतात. यापूर्वी शुक्रवारी लोकसभा अध्यक्षांकडून बोलवण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांकडून हीच मागणी करण्यात आली होती. पण, सरकारने म्हटले की, हा मुद्दा लोकसभेत धन्यवाद प्रस्ताव (मोशन ऑफ थँक्स) वर वादविवादादरम्यान उचलला जाऊ शकतो. यासाठी 2, 3 आणि 4 फेब्रुवारीला 10 तासांचा वेळ ठेवण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!