
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑगस्ट २०२४ | फलटण |
श्री देवांग कोष्टी समाज फलटणचे सदस्य आणि सक्रिय सल्लागार आणि समाजासाठी आपले आयुष्य वाहून घेणारे ज्येष्ठ श्री. नंदकुमार उद्धव कुमठेकर (दादा), रा. रविवार पेठ, फलटण यांचे अल्पशा आजाराने २३ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ८.३० वाजता निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून आज सकाळी १०.०० वाजता स्मशानभूमी, फलटण येथे निघणार होती. कुमठेकर दादांना त्यांचे कुटुंबिय, मित्रमंडळी व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासह नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
