फलटण | दुधेबावी गावचा विकास करण्यासाठी राजे गट कटिबद्ध : विकास सोनवलकर; राजे गटाच्या पेक्षा कोणताही गाव पुढारी मोठा नाही

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑगस्ट २०२४ | फलटण | विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून दुधेबावी गावचा विकास करण्यासाठी राजे गट कटिबद्ध असून आगामी काळामध्ये सुद्धा राजे गटाच्या माध्यमातून दुधेबावी गावामध्ये भरीव असे कामकाज केले जाणार आहे. राजे गटाच्या पेक्षा कोणताही गाव पुढारी मोठा नाही; असे मत दुधेबावीचे युवा नेते विकास सोनवलकर यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना सोनवलकर म्हणाले कि; सर्वसामान्य जनता ही श्रीमंत रामराजे यांच्यावर विश्वास ठेवून कामकाज करीत आहे. त्यामुळे कोणत्याही गाव पुढाऱ्याने जर राजे गट सोडला तरी सुद्धा जनता ही राजे गटाच्या सोबतच होती व यापुढे सुद्धा राहणार आहे. जे काही चार लोक गावगाडा हाकत होते त्यामधील सुद्धा अनेक जण हे राजे गटाच्या सोबतच आहेत. एकदा पुढारी गेला म्हणून गावामध्ये काडीमात्र फरक पडणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत एक कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

Back to top button
Don`t copy text!