ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन; वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यातील निवासस्थानी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

स्थैर्य, गोवा, दि. ०८ ऑक्टोबर : मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा अमिट ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पुत्र मल्हार पाटेकर यांनी या दुर्दैवी वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सलग ४५ मिनिटे सीपीआर देऊनही अपयश

नाना पाटेकर यांना त्रास होऊ लागल्यानंतर त्यांच्या केअरटेकर यांनी रुग्णवाहिका बोलावून घेतली. वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत होते. वैद्यकीय पथकाने तात्काळ सीपीआर सुरू केला आणि त्यांना रुग्णालयात हलवले. रुग्णालयात आणल्यानंतरही डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे सलग सीपीआर देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आले.

वैद्यकीय-कायदेशीर प्रकरण नोंदवले

मणिपाल हॉस्पिटलचे ऑन्कोलॉजी विभाग प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांना मृत अवस्थेतच रुग्णालयात आणण्यात आले होते. ते हृदयविकाराचे रुग्ण होते आणि त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. याप्रकरणी ‘मेडिको-लीगल केस’ (MLC) नोंदवण्यात आली असून, पार्थिव पुढील शवविच्छेदनासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!