
नॅशनल कॅपिटल रीजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये सुपरवायझर आणि ज्युनिअर मेंटेनर्सच्या ९० जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १४ सप्टेंबर : नॅशनल कॅपिटल रीजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने (NCRTC) नमो भारत रॅपिड रेल प्रकल्पाअंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेद्वारे सुपरवायझर-I आणि ज्युनिअर मेंटेनर प्रवर्गात एकूण ९० रिक्त पदे भरली जाणार आहेत. अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा), पदवी आणि आयटीआय (ITI) उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली असून अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
विविध तांत्रिक पदांसाठी भरती आणि वेतनश्रेणी
या भरती प्रक्रियेत सुपरवायझर-I (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स व ऑपरेशन्स) तसेच ज्युनिअर मेंटेनर (इलेक्ट्रिशियन, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स व आरएसी) या पदांचा समावेश आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार आकर्षक वेतनमान दिले जाणार आहे. सुपरवायझर पदासाठी ३७,००० ते १,१५,००० रुपये (लेव्हल S1) आणि ज्युनिअर मेंटेनर पदासाठी १८,२५० ते ५९,२०० रुपये (लेव्हल NS3) या वेतनश्रेणीनुसार पगार मिळणार आहे.
वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि निवडीचे निकष
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय २८ वर्षे निश्चित करण्यात आले असून, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयोमर्याडेत सवलत दिली जाईल. संगणकावर आधारित परीक्षेच्या (CBT) गुणवत्तेनुसार उमेदवारांची अंतिम निवड केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ९ ऑक्टोबर २०२६ रात्री ११:५५ वाजेपर्यंत ‘ncrtc.in’ या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.