हिंगणगावात राजे गटाला धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

हिंगणगावातील उत्तम भंडलकर, गौतम काकडे, शेखर भोई आणि अरुण भोई यांनी शेकडो सहकाऱ्यांसह राजे गटातून भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

स्थैर्य, फलटण, दि. १४ सप्टेंबर : फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथे राजकीय घडामोडींना वेग आला असून उत्तम भंडलकर, गौतम काकडे, शेखर भोई आणि अरुण भोई यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह राजे गटातून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला.

हिंगणगावातील या चार प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या समर्थकांसह राजे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. फलटण तालुक्यातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने या पक्षप्रवेशाकडे लक्ष वेधले गेले आहे.

या पक्षप्रवेशावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, जिल्हा परिषद सदस्या किरण नलावडे, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, जिल्हा परिषद सदस्या सीमा भोईटे, युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, भाजप मंडल अध्यक्ष अमित रणवरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!