वृद्ध पित्याकडून मुलाचा खून


स्थैर्य, खेड, दि.२३: भंडारे गल्‍ली, खेडमध्ये शनिवारी रात्री जन्मदात्या बापानेच व्यसनी मुलावर
लाकडी दांडक्याने हल्‍ला करून त्याचा खून केला. रविवारी सकाळी ही घटना समोर
आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, खुनानंतर सातारा शहर पोलिस
ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) संशयित आरोपीला अटक
केली.

गणेश ऊर्फ किरण श्रीधर भंडारे (वय 40, रा. खेड)
असे खून झालेल्याचे नाव आहेे. याप्रकरणी त्याचे वडील श्रीधर अनंत भंडारे
(वय 72, रा. खेड) याला अटक केली आहेे. दरम्यान, याप्रकरणी मृत गणेश भंडारे
याचा चुलतभाऊ अनिकेत भंडारे (वय 27, रा. खेड) यांनी शहर पोलिस ठाण्यात
तक्रार दिली आहेे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ट्रॅक्टरवरुन थेट शेतात

याबाबत अधिक माहिती अशी, श्रीधर भंडारे व
त्यांचा मुलगा गणेश भंडारे हे सध्या दोघेच घरात राहत आहेत. गेल्या काही
महिन्यांपासून दोघांमध्ये वादावादी होऊन मुलगा गणेश वडिलांना मारहाण करत
होता. या सर्व प्रकारामुळे परिसरातील नागरिकही त्रस्त होते. शनिवारी रात्री
दहाच्या सुमारास बाप-लेकांमध्ये पुन्हा वादावादीला सुरुवात झाली.
दोघांमध्ये शिवीगाळ होऊन हाणामारी झाली. रात्रीची वेळ असल्याने व नेहमीचा
हा प्रकार असल्याने परिसरातील नागरिक कोणीही तिकडे फिरकले नाहीत.

साताऱ्यात दोन दिवसांत 28 बळी

रविवारी सकाळी सातच्या सुमारास मात्र गणेश
भंडारे हा घराच्या बाजूला उघड्यावरच निपचित पडल्याचे नागरिकांच्या लक्षात
आले. गणेश भंडारे याचा चुलतभाऊ अनिकेत भंडारे तेथे पोहोचला. त्यावेळी
त्याने गणेशला पाहिल्यानंतर तो रक्‍तबंबाळ अवस्थेत निपचित पडलेला होता.
त्याने गणेश याला हाका मारल्या मात्र तो कोणताही प्रतिसाद देत नव्हता.
शनिवारी रात्री बाप-लेकामध्ये वाद झाल्याचे समजले. गणेश भंडारे याला तत्काळ
उपचारासाठी सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा
मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले.

अनिकेत भंडारे याच्या लक्षात सर्व प्रकार
आल्यानंतर त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. सातारा शहर पोलिस ठाण्याचे
डीबी पथक सिव्हील व घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन
श्रीधर भंडारे याचा शोध घेतला व त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी प्राथमिक
चौकशी केल्यानंतर श्रीधर भंडारे याने रात्री मुलाला लाकडी दांडक्याने
मारहाण केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यानुसार लाकडी दांडके तसेच
घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, यावेळी सहाय्यक पोलिस अधीक्षक आंचल
दलाल यांनी घटनास्थळी भेट दिली व पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या.

गणेश भंडारे याचा खून झाल्याची चर्चा
परिसरात पसरल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी तक्रारदार अनिकेत
भंडारे यांची तक्रार घेतली. त्यानुसार श्रीधर भंडारे याच्याविरुध्द दुपारी
खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी
श्रीधर भंडारे याला अटक करण्यात आली. सोमवारी त्याला जिल्हा न्यायालयात हजर
केले जाणार आहे.

कोयनेच्या विसर्गाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका : अधीक्षक अभियंता

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस
अधीक्षक धिरज पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या
मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप मोरे, डीबीचे फौजदार नानासाहेब कदम, पोलिस
हवालदार अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, अभय साबळे, गणेश भोंग, संतोष कचरे,
विशाल धुमाळ, विष्णु खुडे, प्रशांत शेवाळे, संदिप आवळे यांनी संशयिताला
ताब्यात घेवून घटनास्थळी व सिव्हीलमध्ये कार्यवाही केली.

वर्मी घाव बसल्याने रात्रभर अंधारात पडून राहिला

वडील श्रीधर भंडारे यांनी मुलगा गणेश भंडारे
याला रागाच्या भरात लाकडी दांडक्याने मारहाण केली. डोक्यासह इतर भागाला
मारहाण झाली. डोक्यात लाकडी दांडक्याचा वर्मी घाव बसल्याने गणेश रक्‍तबंबाळ
झाला. मारहाणीनंतर काही क्षणात तडफडत तो बाहेर आला. रात्रीची वेळ असल्याने
वडिलांच्या लक्षात आले नाही तशातच तो घरातून बाहेर पडल्याने वडिलांनी
दरवाजा बंद केला आणि ते झोपी गेले. तोपर्यंत गणेश रात्री घराबाहेर पडताच तो
जमिनीवर कोसळला व त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!