साताऱ्यात दोन दिवसांत 28 बळी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, सातारा, दि.२३: कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सुरूच असून कम्युनिटी ट्रान्समिशनमुळे
बाधितांचा आकडा वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत कोरोनाने अक्षरश: कहर केला
आहे. शनिवारी आणि रविवारी जिल्ह्यात तब्बल 28 बाधितांचे बळी गेले आहेत.
त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हावासीयांना धडकी भरली आहे. याचबरोबर एकूण 499 जण
कोरोनाग्रस्त झाले असूून बाधितांचा आकडा 7591 झाला आहे.  

जिल्ह्यात समूह संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत
असल्याने बाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळेच रोज 200 हून अधिक
बाधित सापडू लागले आहे. गेल्या दोन दिवसांत कोरोनाचा उद्रेक कायम आहे.
बाधित वाढत असतानाच या दोन दिवसांत बळींचाही सर्वाधिक आकडा झाला आहे. 

वृद्ध पित्याकडून मुलाचा खून

शनिवारी आणि रविवारी एकूण 28 जणांचा
कोरोनामुळे बळी गेला. यामध्ये जिल्हा रुग्णालयात शिरवडे (ता. कराड) येथील
61 वर्षीय पुरुष, मोरोळे (ता. खटाव) येथील 62 वर्षीय पुरुष,  सातार्‍यातील
शनिवार पेठेतील 64 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठेतील 53 वर्षीय महिला,
फडतरवाडी (ता. सातारा) येथील 40 वर्षीय पुरुष, बेलवडी (ता. कराड) येथील 44
वर्षीय पुरुष, म्हसवड (ता. माण) येथील 60 वर्षीय पुरुष, उंब्रज (ता. कराड)
येथील 53 वर्षीय पुरुष, कणूर (ता.वाई) येथील 80 वर्षीय पुरुष, वाठार किरोली
(ता. कोरेगाव) येथील 85 वर्षीय महिला, गोडोली (ता. सातारा) येथील 80
वर्षीय महिला, खोडद (ता. सातारा) येथील 63 वर्षीय पुरुष, केसे (ता. कराड)
येथील 64 वर्षीय पुरुष, विंग (ता. खंडाळा)मध्ये 73 वर्षीय पुरुष, कराड
शहरात शनिवार पेठेतील 65 वर्षीय महिला तर सातारा, वाई व कराड येथील खासगी
रुग्णालयांमध्ये ढेबेवाडी (ता. पाटण) येथील 83 वर्षीय पुरुष, कराडमधील
मंगळवार पेठेतील 74 वर्षीय पुरुष, सोमवार पेठेतील 68 वर्षीय पुरुष,
सह्याद्रीनगर येथील 56 वर्षीय पुरुष, कराडातील मंगळवार पेठेतील 68 वर्षीय
पुरुष, सणबूर (ता. पाटण) येथील 70 वर्षीय पुरुष, बावधन येथील 51 वर्षीय
पुरुष, नावेचीवाडी (ता. वाई) येथील 55 वर्षीय पुरुष, सातार्‍यातील मंगळवार
पेठेतील 61 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठेतील 73 वर्षीय महिला, गडकर आळीतील 57
वर्षीय पुरुष, फुलेनगर (ता. वाई) येथील 55 वर्षीय पुरुष, ढेबेवाडी येथील
83 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.    

तर दोन दिवसांमध्ये आलेल्या रिपोर्टमध्ये सातारा तालुक्यातील सातारा शहर
63, लिंबाचीवाडी (नंदगाव) 1, चिंचणेर निंब 2,  पिरवाडी 1, डबेवाडी 1, अतित
1, शहापूर 1, कोडोली 1,  काशिळ 1,  शेंद्रे 1,  

नागरिकांनो कोरोनाची पुढची लाट येण्याची शक्यता ; सुरक्षित अंत व मास्क्चा वापर कराच

निंब 6, शिवथर 1,  खेड 1,  खावली 1,  देगाव
1, धावडशी  1 अशा 84 जणांना बाधा झाली आहे. महाबळेश्‍वर तालुक्यातील भेकवली
1, महाबळेश्‍वर 22, रांजणवाडी  1, तापोळा 1,देवळी 1, मेतगुताड 2, असे 28
रूग्ण आढळून आले. कराड तालुक्यातील कराड शहर 63,  कापिल 2, मलकापूर 7, पाल
1, मसूर 2, नांदगाव 1,  वारुंजी विमानतळ 1, कुसुर 1, विद्यानगर 2, ओंड 4,
 सैदापूर 1, चचेगाव 1, किणी 1,  कोपर्डे हवेली 1, जखीणवाडी 7, शिरवडे 1,
कोळे 1, आगाशिवनगर 3, बनवडी 2,  रेठरे 1, किवळ  2, काले 3, कोळे 1,
म्होप्रे 1, खालकरवाडी 1,  गोळेश्‍वर 1, शेरे 1, गोटे 4, वडगाव हवेली 3,
खुबी 1, गोवारे 1,  हिंगनोळे 1, शिंगणवाडी 1, असे 122 पॉझिटिव्ह सापडले
आहेत. 

वाई तालुक्यातील वाई शहर 58, पसरणी 2,
व्याजवाडी 3, विरमाडे 1,  जांब 4,  सोनगिरवाडी 6,  कडकी 1,  ओझर्डे
-कदमवाडी 1,  शाहबाग 1,  शेंदूरजणे 1, रामडोहाळी 1, भोगाव 1,  बावधन 3,
उडतारे 1, भूईज 3, कणूर 1, वाशिवली 1, नावेचीवाडी 3, रामडोहाळी 2, चिखली 1
असे 95 जण बाधित आले आहेत. खटाव तालुक्यातील  गुरसाळे 1,मोरोळे 2,  वडूज 3,
पुसेगाव 1, मायणी 2, डांभेवाडी 3, राजाचे कुर्ले 4, मोराळे 1, मायणी 4,
फडतरवाडी 1, जायगाव 3,  गुंडवाडी 1 अशा 26 जणांना लागण झाली आहे. 

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 5, रहिमतपूर
11, कुमठे 11, चवणेश्‍वर 3, वाठार किरोली 2, करंजखोप 3, विखळे 1, गिघेवाडी
1, पळशी 1 असे 36 बाधित आले आहेत. माण तालुक्यातील  म्हसवड 5,भालवडी 3,
देवापूर 1, मलवडी 1 वरकुटे 1 अशा 11 जणांना लागण झाली आहे. 

खंडाळा तालुक्यातील पळशी 3, खंडाळा 2,
नायगाव 4, शिरवळ 4, वाण्याचीवाडी 1, पाडळी 1, लोणंद 1, शिरवळ 12,  नायगाव
1, खंडाळा 2, झगलवाडी 1 असे 32 जण पॉझिटिव्ह आले आहेत. जावली तालुक्यातील
 नेवेकरवाडी 2, मोरघर 2 अशा चौघांना बाधा झाली आहे. 

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ट्रॅक्टरवरुन थेट शेतात

फलटण तालुक्यातील फलटण शहर 24, फलटण 1, मलठण
1, मांडव खडक 1,  मांडव खडक 2, गुणावरे 8, कोर्‍हाळे 3, ठाकूरकी  1,
सस्तेवाडी 1, मुंजवडी 1, मुरूम 1, नांदण 1, आदर्की 2, बिरदेवनगर 1,
साखरवाडी 3 असे 51 जण पॉझिटिव्ह आले आहेत. पाटण तालुक्यातील माजगाव 2, पाटण
 8, मल्हारपेठ 2, मारुल हवेली 6, ढेबेवाडी 3, सणबुर 1, गारवडे 2, मालदन 2
अशा 25 जणांना लागण झाली आहे. 

याचबरोबर काळमवाडी, ता. वाळवा जि. सांगली 2,
अंबक, ता. कडेगाव 1, डोंबवली (ठाणे) 1, ताडदेव (मुंबई) 1, जेजुरी, जि.
पुणे  1, पेठ वडगाव जि. कोल्हापूर 1, रेठरे व अंबिकानगर जि. सांगली 2 अशा 9
जणांचे जिल्ह्यात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात दोन दिवसात 543 जणांनी कोरोनावर
मात केली. आतापर्यंत 3 हजार 940 जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 242 जणांचा
मृत्यू झाला आहे. 

सिव्हिलमध्ये रेमडेसीवीर इंजेक्शनचाही गफला…

सातारा जिल्ह्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सुरुवातीच्या टप्प्यात 125 रेमडेसीवीरची
कोरोना प्रतिबंधक इंजेक्शन दिली होती. ही इंजेक्शन्स तत्कालीन सिव्हिल
सर्जन यांच्या ताब्यात देण्यात आली होती. मात्र, या इंजेक्शनमध्ये गफला
झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या नवीन प्रकरणाने सिव्हिल पुन्हा एकदा
चर्चेत आले आहे. खा. शरद पवार यांनी त्यांचे स्वीय सहायक सतीश राऊत
यांच्यामार्फत सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनील माने व
सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्याकडे सुरुवातीच्या टप्पयात 125 रेमडेसीवीर
ही इंजेक्शन्स दिली होती. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच सिव्हिल
हॉस्पिटलच्या ताब्यात ही इंजेक्शन्स दिली. प्रत्यक्षात ही इंजेक्शन्स
कोणाला देण्यात आली याची कोणतीही यादी सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही.
याबाबत तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांच्याकडे राजकुमार
पाटील यांनी ज्या पेशंटना  रेमडेसीवीर देण्यात आली त्यांची यादी मागितली.
मात्र, गडीकर यांनी ही यादी दिली नसल्याचे राजकुमार पाटील यांचे म्हणणे
आहे. गरीब पेशंटसाठी खा. शरद पवार यांनी ही औषधे पाठवली होती. मात्र,
त्यांच्यापर्यंत ती पोहोचली नसल्याने या औषधांमध्ये काय गफला झाला? कुणी
गफला केला? या विषयी आता चर्चा सुरु झाली आहे. खा. शरद पवार यांनी गेल्याच
आठवड्यात 50 इंजेक्शन दिली आहेत. ही इंजेक्शन मात्र जिल्हाधिकारी शेखर सिंह
यांच्याकडे देण्यात आली. त्यामुळे त्या 50 चा हिशेब लागत आहे. मात्र
आधीच्या 125 इंजेक्शनची यादी मिळत नसल्याने नवीन सिव्हील सर्जन डॉ. सुभाष
चव्हाण यांनी याबाबतची चौकशी लावली आहे. सिव्हीलमधील जुन्या भानगडी थांबता
थांबत नाहीत असेच या प्रकारावरुन दिसत आहे.

श्रीमती सुशिला ताथवडकर यांचे निधन


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!