
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. १० जुन २०२२ । फलटण । राज्यातील २०८ नगरपरिषदा व १३ नगरपंचायतीचा सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्यासाठीचा मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेला आहे.
याबाबत निवडणूक आयोगाने दि. २१ जुन २०२२ रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार आहेत. त्यावर दि. २७ जुन २०२२ पर्यंत प्रारूप मतदार यादीवर हरकती व सुचना दाखल करण्यासाठी कालावधी देण्यात आलेला आहे.
तद्नंतर दि. ०१ जुलै २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. दि. ०५ जुलै २०२२ रोजी मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार आहे.
