मुंबई महापालिकेची कामगारांना मोठी दिवाळी भेट; 15 हजार 500 रुपये बोनसची महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून घोषणा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, दि.२: दिवाळीला अवघे काही दिवस बाकी असताना मुंबई महापालिकेने कामगारांसाठी मोठी भेट देऊन दिवाळी गोड केली आहे. मुंबईचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी कामगारांना 15 हजार 500 रुपये बोनस देण्याची घोषणा केली आहे. कोरोना संकटामुळे कामगारांच्या बोनसमध्ये गेल्यावर्षीपेक्षा फक्त 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

कामगार संघटनांनी 20 हजार रुपये बोनस देण्याची मागणी केली होती. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी करत हा तिढा सोडवला आणि आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन कामगारांचा बोनस जाहीर केला. यानुसार पालिका कामगारांना 15 हजार 500, अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 7750, शिक्षण खात्यात मनपा प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना 4700 आणि अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना 2350 रुपये बोनस देण्यात येणार आहे. शिवाय सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 4400 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा किशोरी पेडणेकर यांनी केली.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!