दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावांचा संकल्प; सहा विभागांत विशेष कार्यक्रमांचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

ग्रामीण महाराष्ट्राला दुष्काळमुक्त आणि जलसमृद्ध बनविण्यासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत’ राज्यातील सहा विभागांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकारातून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला जात आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १७ नोव्हेंबर : राज्यातील ग्रामीण भाग स्वयंपूर्ण आणि जलसुरक्षित करण्याच्या उद्देशाने ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत विभागस्तरीय सोहळे आयोजित केले आहेत. यामध्ये अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यशाळा आणि ‘दुष्काळावर मात आणि समृद्ध गावाचा संकल्प’ या विषयावर विशेष परिसंवादही पार पडणार आहेत.

जलसंधारण आणि गावाच्या जलसुरक्षा आराखड्यावर भर

अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात दुष्काळावर मात आणि जलसुरक्षा हा मुख्य केंद्रबिंदू ठेवण्यात आला आहे. याअंतर्गत प्रत्येक गावाचा जललेखा आणि ग्रामसभेच्या मान्यतेने जलसुरक्षा आराखडा तयार केला जाणार आहे. तलाव, नद्या, नाले व विहिरींचे पुनरुज्जीवन, पावसाच्या पाण्याचे संकलन, भूजल पातळीत वाढ आणि शेततळ्यांच्या कामांना मनरेगा व इतर योजनांच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाणार आहे.

सहा विभागांतील कार्यक्रमांचे नियोजन

हे विभागस्तरीय कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर (१९ नोव्हेंबर), नागपूर (२० नोव्हेंबर), अमरावती (२१ नोव्हेंबर), नाशिक (२६ नोव्हेंबर), कोकण (३० नोव्हेंबर) आणि पुणे (१ डिसेंबर) येथे पार पडणार आहेत. या कार्यक्रमांना संबंधित जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, सरपंच, सदस्य तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार असून लोकसहभागातून दुष्काळमुक्त गावांची निर्मिती करण्याचा संकल्प केला जाणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!