दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२४ | फलटण |
महाराष्ट्र स्टेट डान्स असोसिएशन यांच्यातर्फे घेण्यात येणार्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची अदिती पावणे हिची सातारा जिल्ह्यातून १४ वयोगटा खालील गटामध्ये नृत्यासाठी निवड झाली आहे. ही नृत्य स्पर्धा आयोध्या येथे दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी पार पडणार आहे.
अदिती नृत्यकला अकॅडमी येथे नृत्याचे प्रशिक्षण घेत आहे. तसेच प्राचार्य श्री सुधीर अहिवळे सर यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे.
अदितीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने या स्पर्धेसाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विशेष अशी आर्थिक मदत या स्पर्धेला जाण्यासाठी केली आहे.
अदितीला नृत्य स्पर्धेसाठी मुधोजी हायस्कूलच्या सर्व शिक्षकांनी, प्राचार्यांनी तसेच आमदार दीपक चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
नृत्यामध्ये फलटण तालुक्याचे नाव अयोध्या नगरीमध्ये उंचवणार, असे आश्वासन अदितीने दिले आहे.