दैनिक स्थैर्य | दि. 30 ऑगस्ट 2024 | फलटण | संजय घोडावत ग्रुपचे स्टार लोकलमार्ट हे फलटणकर नागरिकांच्या पसंतीस उतरेल असे मत जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
संजय घोडावत ग्रुपच्या स्टार लोकलमार्टच्या फलटण शाखा उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी फलटण शहरासह तालुक्यातील नागरिकांना संजय घोडावत ग्रुपच्या माध्यमातून स्टार लोकलमार्टच्या माध्यमातून दर्जेदार व स्वस्त गृह उपयोगी वस्तू त्यामध्ये प्रामुख्याने किराणा, स्टेशनरी व इतर माल हा उपलब्ध झाला आहे. याचा नक्कीच फायदा फलटणकर नागरिक घेतील; असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.