

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बारावी (HSC) बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. तिन्ही शाखांमधून एकूण ६६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शाळेने यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ५ मे : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या इयत्ता १२ वी (HSC) बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत मागील वर्षाप्रमाणेच निकालाची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राखली आहे.
■ एकूण निकाल आणि श्रेणीनिहाय कामगिरी:
एचएससी बोर्डाच्या परीक्षेसाठी महाविद्यालयातून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतून एकूण ७१७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तब्बल ६६८ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत.
-
विशेष श्रेणी (Distinction): एकूण २६ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. यामध्ये कला शाखेतील १, वाणिज्य शाखेतील ९, तर विज्ञान शाखेतील १६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
-
प्रथम श्रेणी (First Class): एकूण १८३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश संपादन केले. यामध्ये कला शाखेतील १९, वाणिज्य शाखेतील ४७, तर विज्ञान शाखेतील ११७ विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
■ शाखांनिहाय निकाल व महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी:
१) विज्ञान शाखा (Science) – निकाल: ९९.२७%
विज्ञान शाखेतून एकूण ४१२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ४०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
-
प्रथम क्रमांक: सिद्धांत साळुंखे (५३६ गुण – ८९.३३%)
-
द्वितीय क्रमांक: सई सुर्वे (५१२ गुण – ८५.३३%)
-
तृतीय क्रमांक: संस्कृती फरांदे (५०९ गुण – ८४.८३%)
२) वाणिज्य शाखा (Commerce) – निकाल: ८३.४९%
वाणिज्य शाखेतून एकूण २१२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
-
प्रथम क्रमांक: अश्विनी नेवसे (५४५ गुण – ९०.८३%)
-
द्वितीय क्रमांक: प्रणिता कांबळे (५२१ गुण – ८६.८३%)
-
तृतीय क्रमांक: पूनम कचरे (४९३ गुण – ८२.१७%)
३) कला शाखा (Arts) – निकाल: ८८.१७%
कला शाखेतून एकूण ९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
-
प्रथम क्रमांक: यशराज मदने (४७९ गुण – ७९.८३%)
-
द्वितीय क्रमांक: अंजली कदम (४४३ गुण – ७३.८३%)
-
तृतीय क्रमांक: सई चव्हाण (४३९ गुण – ७३.१७%)
■ मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव:
या परीक्षेत उत्तम यश संपादन केलेल्या सर्व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार मा. श्री. दीपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.
तसेच, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी मा. अरविंद निकम, तपासणी अधिकारी मा. दिलीप राजगुडा, सहाय्यक तपासणी अधिकारी मा. सुधीर अहिवळे, प्रशालेचे प्राचार्य मा. वसंतराव शेडगे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य मा. सोमनाथ माने, माध्यमिकचे उपप्राचार्य मा. ए. वाय. ननवरे, माध्यमिकचे पर्यवेक्षक मा. राजेंद्र नाळे, मा. रावसाहेब निंबाळकर, पर्यवेक्षिका सौ. पूजा पाटील, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
