मुधोजी महाविद्यालयाला आंतरविभागीय व्हॉलिबॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले येथे संपन्न झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतरविभागीय व्हॉलिबॉल महिला स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला.

बाद व साखळी फेरीच्या स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालयाने विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले, बाबासाहेब चितळी महाविद्यालय भिलवडी, देवचंद कॉलेज अर्जुननगर या संघावर सरळ सेटमध्ये विजय मिळवत उपांत्यफेरीत प्रवेश केला.उपांत्य फेरीमध्ये के. आर. पी. कन्या महाविद्यालय इस्लामपूर बरोबर २५-२२, १५-२५, १५-१३ ने हार पत्करावी लागली.

या संघामध्ये श्रद्धा शिंदे, अर्पिता गायकवाड, वैष्णवी फडतरे, साक्षी गायकवाड, श्रद्धा निंबाळकर, शिवानी शिंदे, साक्षी शिंदे या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली.

फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम सर यांनी सर्व संघाचे अभिनंदन केले.

Back to top button
Don`t copy text!