सौ. सुजाता व दिलीप ढोले यांचे कामकाज कौतुकास्पद : नगर विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे


दैनिक स्थैर्य । दि.१८ नोव्हेंबर २०२१ । फलटण । कोरोना काळामध्ये प्रामाणिकपणे प्रशासकीय कर्तव्य बजावणाऱ्या ढोले दाम्पत्यांची कामकाज हे कौतुकास्पद असून सौ. सुजाता व दिलीपराव ढोले यांचा आदर्श तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे असल्याचे मत नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशन यांच्या तर्फे कोरोना योध्दा हा पुरस्कार सौ. सुजाता व दिलीप ढोले यांना ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहामध्ये सन्मानपूर्वक देण्यात आला. त्या वेळी नगर विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू, आदिती तटकरे, खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे – पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!