शिक्षक सहकार संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी श्री.रविराज खडाखडे तर जिल्हा सरचिटणीस पदी श्री.सुनिल फुंदे यांची निवड


 

मा.श्री.रविराज खराडे – जिल्हाध्यक्ष, शिक्षक सहकार संघटना, सोलापूर.

स्थैर्य, सोलापूर, दि. २: शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेची गुगल मीट आॅनलाईन पुणे
विभागाची सहविचार सभेचे आयोजन संघटनेचे राज्याध्यक्ष श्री.संतोष पिट्टलवाड
यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेमध्ये पुणे विभागाचे प्रमुख
श्री.मनोज कोरडे हे उपस्थित होते. या सभेमध्ये संघटनेने आजपर्यंत
शिक्षकांसाठी सोडविलेले प्रश्न, स्थानिक पातळीवर निर्माण झालेले
प्रश्न,आंतरजिल्हा बदली पहिला टप्पा ते चौथ्या टप्यापर्यंत शासन दरबारी
केलेला सतत पाठपुरावा यामुळे संघटनेला यश मिळाले असे श्री.संतोष पिट्टलवाड
यांनी सांगितले. या सभेसाठी पुणे विभागातील असंख्य पदाधिकारी सहभागी झाले
होते.शिक्षकांना असणार्र्या अडचणी वर चर्चा झाली.

या सभेसाठी
सोलापूर जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते,सहभागी झालेल्या
सर्वांचे स्वागत श्री.दिपक परचंडे – राज्य कार्यकारणी सदस्य यांनी केले.या
सभेमध्ये शिक्षक सहकार संघटना महा.राज्य शाखा-सोलापूर च्या नुतन कार्यकारणी
ची निवडीमध्ये जिल्हाध्यक्षपदी श्री.रविराज खडाखडे यांची निवड सर्वानुमते
करण्यात आली,तर संघटनेच्या सरचिटणीस पदी श्री.सुनिल फुंडे यांची निवड झाली.

संघटनेच्या
नुतन कार्यकारणी मध्ये जिल्हा सल्लागार-श्री.नागनाथ राजमाने,जिल्हा
कार्याध्यक्ष-श्री.आबासाहेब तरंगे,जिल्हा कोषाध्यक्ष-श्री.सचिन
निरगिडे,जिल्हा संघटक-श्री.राजेंद्र पडदुणे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुखपदी
श्री. नेहरू राठोड यांची निवड करण्यात आली.

नुतन कार्यकारणी मध्ये
निवड झालेल्या सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन श्री.अंकुश वाघमोडे, बजरंग
कोळी,पुजारी सर,यल्लप्पा विटकर, सत्यनारायण नडीमेटला,रविंद्र जेटगी,दीपक
कांबळे,सिद्धाराम कोळी,कृष्णा बेळळे, मुंढेवाडी,नागनाथ बिराजदार, प्रकाश
खददे,महान्तेंश भंडारकवठे,म्हाळप्पा लवटे,अनंत कदम,काशिनाथ कोळी,
हसरमनी,शिवाजी कदम,सुधिर मोटे,विठ्ठल टेळे,सुहास भोसले,गजेंद्र
पतंगे,ज्ञानेश्वर मिसाळ,संजय बेंदगुडे,अविनाश कुलकर्णी,संतोष कोळी,हनुमंत
गायकवाड,बालाजी मुदुगाडे,प्रकाश विजापुरे,उमेश सरवाळे,प्रविण इंगोले,जयवंत
कोळेकर,श्रीम.उमा घोरपडे,अश्विनी चिलवंत,विजया कोळी,सुचिता अंकुशराव मॅडम
आदींनी सर्वांचे अभिनंदन केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!