रणजितदादा पाणीदार खासदारच; खुद्द ना. देवेंद्र फडणवीस यांचीच स्पष्टोक्ती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 05 मे 2024 | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघातील प्रस्थापितांची मक्तेदारी कायमस्वरूपी मोडून काढण्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने रणजितदादा हे पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून जाणार आहेत. रणजितदादा यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील ज्या पद्धतीने पाण्याचे प्रश्न सोडवले आहेत त्यामुळे मीच त्यांना पाणीदार खासदार असे कायम म्हणतो; असे मत उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित विजयी संकल्प सभेत उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, माढा लोकसभेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार प्रसाद लाड, माजी जिल्हा परिषद सभापती मंगेश धुमाळ, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील, उद्योजक राम निंबाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम महाराणी सईबाई यांच्याचरणी नमन करत रणजितसिंह हे पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने खासदार म्हणून निवडून जाणार आहेत. जिथं पर्यंत माझी नजर जात आहे; तेवढी जनता आहे. रणजितदादा मला फलटणमध्ये मला मतं मागायला बोलायची गरज नव्हती; कारण हिमालयासारखा फलटण तुमच्या पाठीशी आहे. जर आज या ठिकाणी रामराजे यांनी जर उचित निर्णय घेतिला असता तर मला अधिक आनंद झाला असता. अस्मितेच्या विरोधात जर निर्णय घेतला तर त्याच काय होईल हे सांगता येत आहे; असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना ना. फडणवीस म्हणाले की; फलटणमध्ये आता कमळ उगवणार आहे. हि लढाई रणजितसिंह विरोधात धैर्यशील पाटील अशी नाही तर हि लढाई मोदी विरुद्ध गांधी अशी आहे. ज्या वेळी पवार साहेब माढा मतदारसंघातून उभे होते तेंव्हा ते माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडवणार होते ते पाण्याचा एक थेंब सुद्धा देऊ शकले नाही. केंद्रात व राज्यात सुद्धा त्यांचेच पाणी होत. त्यांनी माढा मतदारसंघात जर पाणी दिले असते ज्यांनी पाणी पळवले असते तर त्यांनाच पाणी मिळाले नसते. ह्या रणजितसिंह यांनी पळवले पाणी पुन्हा मिळाले आहे. पाणी परत आणल्यावर सर्व ह्या नेत्यांनी ठरवलं कि रणजितसिंह यांचा कार्यक्रम करायचा. इथं देशाचे नेते येवू किंवा आंतरराष्ट्रीय येवू रणजितसिंह यांचं काही वाकडं करू शकणार नाही.

आता खरी वेळ हि फलटणकरांची आहे. फलटण करांनो ९० टक्के मते हि रणजितदादांना मिळाली पाहिजेत. फलटणकर एकदा नुसते पाठही उभे राहिले. नीरा – देवधर व धोम बलकवडी काम पूर्ण झाले तर फलटण तालुका दुष्काळी राहणार नाही. नरेंद्र मोदींचे सरकार आल्याने सातारा तालुकयातील दुष्काळ हा आम्ही भूतकाळ करणार आहोत. कालवा जोड प्रकल्प हा देशातील अभिनव प्रकल्प आहे. त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. फलटण तालुक्याच्या बाजूला राष्ट्रीय नेते आहेत त्यांनी फलटण ते बारामती रेल्वे निदान थोडी तरी आली असती. फलटण ते बारामती रेल्वे साठी एक रुपया देणार नाही असा निर्णय स्वतः पवार साहेबानी घेतला होता. याचा उल्लेख मिनिट्स मध्ये आहे. आता तुतारीच्या पिपाणी करायची आहे. इतके वर्षे सत्ता तुमच्याकडं होती; एवढ्या वर्षात तुम्ही काही करू का शकला नाही; असे मत यावेळी ना. फडणवीस यांनी व्यक्त केले.

या देशामध्ये महायुतीची सत्ता येणार आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहे. हा भाग दुष्काळी ठेवण्याचे काम कुणी केले आहे; हे जाणून घेणे गरजेचे आहे. मी आता खासदार झालो आहे. माझा मोठा भाऊ हा देशाचा पंत्रप्रधान आहे. जर देशाचा मोठा भाऊ जर देशाचा पंतप्रधान असेल तर दुष्काळी भागाचे प्रश्न सोडवणे आता फार अवघड आहे. मला फलटण तालुक्यातील प्रत्येक गाव माहित आहे. तुमच्या गावातील पोरगा खासदार होत आहे. फलटणला रेल्वे बनवणायची कंपनी सुरु करणे गरजेचे आहे. नुसतं शाहू, फुले आंबेडकर यांच्या नावावर राजकारण करणारा माणूस नको. ह्या भाजपाने ८ ओबीसी बांधवाना खासदार केले आहे. तुम्ही फक्त आमच्यावर प्रेम करा तुम्हाला फडणवीस साहेब काही कमी पडू देणार आहे; असे मत यावेळी महादेव जानकर यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना महादेव जानकर म्हणाले की; मला फलटणला विमानतळ सुद्धा पाहिजे. विमानतळामध्ये प्लॉटिंगचे काम सुरु आहे. माढा मतदारसंघात पंचतारांकित एएमआयडीसी आम्हाला पाहिजे. आता आम्हाला खाली मान घालायला लावू नका. माझं किंवा रणजितदादांच यांचे काही चुकले असेल तर आम्हाला मोठ्या मानाने माफ करा. हि निवडणूक हि नागपरिषद, जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत नाही आहे. देशाचे भलं जो करणार आहे त्याच्या सोबत राहणे गरजेचे आहे. मोदीजी घटना बदलणार नाही. आम्ही आणि मोदीजी सुद्धा मागासवर्गीय आहोत.

ना. देवेंद्र फडणवीस हे दुष्काळी भागाचे देव आहेत. पाच वर्षांपूर्वी जेंव्हा सांगता सभा सुरु झाली होती. त्यावेळी तुम्ही जे शब्द दिले होते ते आता पूर्णत्वास गेले आहेत. माझ्याकडे कोणताही सत्ता स्थान नसताना पचवर्षांपूर्वी तालुक्याने मला स्वीकारले होते. पाच वर्षांपूर्वी आम्ही जे शब्द दिले होते ते शब्द पूर्ण झाले आहेत. आपल्याला केंद्र व राज्य सरकारने हजारो कोटींचा निधी दिला आहे. या तालुक्यात भारतामधील पहिला जोड कालवा सुद्धा तुम्ही दिला आहे. आमच्या तालुक्यात फक्त चार महिने कॅनॉल चालत होता आता आठ महिने कॅनॉल सुरु राहणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दाची पूर्ण झाले आहेत. तालुक्याला अपेक्षित नव्हती एवढी विकासकामे ह्या पाच वर्षात झाली आहेत. गेल्या पंचवार्षिक मध्ये अडीच वर्षे आपले सरकार नव्हते तरी सुद्धा राहिलेल्या अडीच वर्षात राहिलेला बॅकलॉग देवेंद्र फडणवीस यांनी भरून काढली आहेत; असे मत यावेळी खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले की; फलटण तालुक्यातील जनता हि इतर ठिकाणी १० ते १५ टक्के सुद्धा मतदान करणार नाही. फलटणच्या बाणगंगा नदीमध्ये आता गटार वाहत आहेत. आता पुढचा आमचा तोच प्रकल्प हाती घेणार आहेत. नीरा देवधरचे अतिरिक्त पाणी आम्ही बाणगंगा नदीमध्ये सोडणार आहे. आणि बाणगंगा नदी वाहती करणार आहे. फलटण शहराचा व तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कामकाज करीत आहोत. त्याचा मॉडर्न प्लॅन आम्ही तयार केला आहे. राज्यातील सर्वात सुंदर शहर म्हणून फलटण आम्हाला विकसित करायचे आहे. आता जर यादी वाचली तर ६ वाजून जातील. मी इथे कुणाला पडायला नाही तर कुणाचीही जिरवयाची नाही. आणि तालुक्यातील हे तिन्ही भाऊ फक्त मला हरवायला म्हणून माझ्या विरोधात कामकाज करीत आहेत. माझ्या जन्मभूमीची दायित्व फेडण्याची संधी मला फलटण ने द्यावी. मी जर चुकीच्या पद्धीतीने वागणूक दिली असती तर हि जनता इथं आलीच नसती. फलटण तालुका हा टॉप मोस्ट करण्यासाठी मला संधी द्या. या तालुक्यातील जनता विकासामुळे माझ्या सोबत राहणार आहे.

अजितदादा यांच्या नेतृत्वात आम्ही कामकाज करणार आहे आणि करत राहणार आहे. आमचे नेते अजितदादा पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही कामकाज करीत आहोत व या पुढे सुद्धा आम्ही कामकाज करणार आहोत; असे मत सातारा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केले.

यावेळी फलटण तालुक्यामधील गोखळी येथील नवनाथ गावडे, आरडगाव येथील रवींद्र शिर्के, आळजापूर येथील विलासराव नलवडे, शुभम नलवडे, तर दुधेबावी येथील लक्ष्मण सोनवलकर यांचा प्रवेश उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला.

ना. देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली घोंगडी तर खासदार रणजितसिंह यांनी केले घोंगडी घालून भाषण

फलटण तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घोंगडी, काठी व भंडारा देत सन्मान करण्यात आला होता. या सोबतच खासदार रणजिततसिंह यांचा सुद्धा स्वतंत्र सन्मान धनगर समाजाच्या वतीने करण्यात आल्यानंतर खासदार रणजितसिंह यांनी त्यांचे संपूर्ण भाषण पूर्ण होईपर्यंत घोंगडी आपल्या अंगावर ठेवली होती.


Back to top button
Don`t copy text!