दैनिक स्थैर्य | दि. २७ मे २०२३ | फलटण |
जावई व सासरचे लोक मुलीस त्रास देत असल्याच्या कारणावरून मुलीस माहेरी घेऊन आलेल्या महिलेस जावयाने मेसेज करून मनास लज्जा उत्पन्न होईल असा छुपा पाठलाग केल्याने जावयाविरोधात त्या महिलेने फलटण शहर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अमित अशोक चव्हाण (रा. श्रीकृष्णनगर, तारदाऴ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या जावयाचे नाव आहे.
या घटनेची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, १६ मे २०२३ रोजी दुपारी १२.२८ वाजण्याण्या सुमारास पुजारी कॉलनी, कॅनॉलजवऴ, फलटण येथे पीडित फिर्यादी सासू यांनी जावई अमित अशोक चव्हाण याने व सासरचे लोक मुलीला त्रास देत असल्याने तिला माहेरी घेऊन आल्या. या कारणावरून चिडून जाऊन फिर्यादी सासूच्या मोबाईलवर तसेच किशोरीच्या सीमकार्डवर जावयाने वारंवार मेसेज करून मनास लज्जा उत्पन्न होईल असा छुपा पाठलाग केला आहे. तसेच अश्लील शिवीगाऴ केली आहे, अशी तक्रार फिर्यादी महिलेने पोलिसात दिली आहे.
या प्रकरणी जावई अमित अशोक चव्हाण (रा. श्रीकृष्णनगर, तारदाळ, ता. हातकणंगले) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास येऴे करत आहेत.